साई बाबांच्या शिर्डीत भक्तांच्या ‘लिला’

हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस! १५ तरुणींसह ११ आरोपी…

शिर्डी Shirdi: भारतातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साई बाबांच्या Sai baba श्री क्षेत्र शिर्डी शहरात भक्तांच्या नावाखाली येणाऱ्या आंबशौकीन लोकांनां अश्लील ‘ लिला ‘ करतांना पोलीसांकडून पकडले गेले आहे. पोलिसांनी हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आणले आहे. पोलिसांनी शुक्रवारी रात्री अचानक अनेक हॉटेलवर छापे टाकले. यामध्ये १५ मुलींची सुटका करण्यात आली असून ११ आरोपींनी अटक करण्यात आली आहे. बाहेरगावच्या भाविकांच्या निवासाची सोय व्हावी,म्हणून चालविण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या हॉटेलमध्ये हे प्रकार सुरू होते. पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळताच अनेक हॉटेल चालकांनी आपले हॉटेल बंद करून गायब होणे पसंद केले.

 

या बाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. शिर्डीत अनेक हॉटेलमध्ये अशा प्रकारे अनैतिक व्यवसाय चालत असल्याची गुप्त माहिती मिटके यांना मिळाली होती. सदर गुप्त माहिती आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी रात्री पोलिसांनी सापळे रचून हॉटेलवर कारवाई सुरू केली. जेथून माहिती मिळाली होती, अशा ६ हॉटेलवर छापे टाकण्यात आले. मिळालेली गुप्त माहिती खरी निघाली. या ६ ठिकाणी मिळून ११ आरोपींना अटक करण्यात आली. तेथून १५ मुली आणि महिलांची सुटका करण्यात आली.

दरम्यान, लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र शिर्डी येथे असे प्रकार उघडकीस आल्याने साई बाबांच्या भक्तांमध्ये संताप व्यक्त होत आहे. हे घाणेरडे प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे. काही आंबशौकीन लोक ‘खास’ याच कामा साठी येथे येतात असे बोलल्या जात आहे. पोलिसांनी वरचेवर अशा प्रकारच्या कारवाया केल्या पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

#mahajagran maha jagran #महा_जागरण #

Leave a Reply