परशुराम सेवा संघाच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी आनंद कुलकर्णी

सतीष जोशी-तालखेडकर तालुकाध्यक्षपदी 

माजलगाव: येथे परशुराम सेवा संघाची बैठक संस्थापक अध्यक्ष अनिल मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत मराठवाडा उपाध्यक्षपदी आनंद कुलकर्णी तर तालुका अध्यक्षपदी सतीश जोशी तालखेडकर यांची निवड करण्यात आली.

 

या बैठकीमध्ये पुढील काळात कुठले उपक्रम राबवल्या जातील या विषयावर चर्चा करण्यात आली ,या मध्ये परशुराम सेवा संघाच्या माध्यमातून राज्यस्तरीय तुकाराम महाराज पारायण सोहळा करण्याचे ठरवण्यात आले.तसेच विविध जयंतीच्या निमित्ताने व्याख्यान, कीर्तन,शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात मदत करण्यासाठी प्रयत्न राहतील असे विविध उपक्रम घेण्याचे ठरवण्यात आले.त्यानंतर या बैठकीमध्ये काही निवडी करण्यात आल्या.यामध्ये आनंद कुलकर्णी सर व सतीश जोशी तालखेडकर यांनी मागील कार्यकाळात ब्राम्हण समाजामधील सर्व जन्मोत्सव, जयंती साजरी करणे, त्याचबरोबर वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना मदत, कोरोना सारख्या संकटात अनेक घरात डब्बा पुरवणे, सॅनिटायझर, मास्क, आर्थिक सहकार्य , किराणा किटचे वाटप, ब्राम्हण समाजातील सर्व धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन, नियोजन करणे, ब्राम्हण समाजातील कुठल्याही थोर पुरूषांचा अवमान झाला असता त्याला विरोध करत मोर्चे, आंदोलण करणे यात नेहमीच श्री. कुलकर्णी, श्री. जोशी यांचा पुढाकार असतो. याची दखल घेत परशुराम सेवा संघाच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी आनंद कुलकर्णी तर तालुकाध्यक्षपदी सतिष जोशी यांची निवड करण्यात आली व तसे नियुक्तीपत्र परशुराम सेवा संघाचे राष्ट्रिय संस्थापक अध्यक्ष अनिल मुळे यांनी दिले.

 

या निवडीबद्दल परशुराम सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक विनायक रत्नपारखी यांनी आनंद कुलकर्णी सतीश जोशी यांचे विशेष कौतुक केले , त्यांनी समाजामध्ये अतिशय उल्लेखनीय कार्य केल्यामुळेच त्यांनी केलेल्या कामाची पावती मिळाली आहे .या निवडीबद्दल विश्वजीत देशपांडे, डॉ प्रकाश आनंदगावकर रमेश आडसकर मोहन जगताप ओमप्रकाश शेटे अरुण राऊत बबन सोळंके डॉ अशोक तिडके नितीन नाईकनवरे शिवाजी रांजवन , लक्ष्मीकांत राजुरकर, दिपक कुलकर्णी, नरेश देवळे, सुहास ठोसर , संतोष कोथळकर अंबादास देशमुख श्री नाईक भास्करराव भोले भाऊसाहेब नाईक अशोक रोडे दत्ता नांदुरकर मुकुंद नाईक, तुकाराम येवले, उमेश मोगरेकर, अनंत जोशी, कमलेश जाब्रस, दत्ता महाजन, प्रशांत पाटील, बी. एन. कुलकर्णी,डॉ स्वानंद कुलकर्णी, डॉ. श्रेयश देशपांडे, डॉ. प्रकाश आनंदगांवकर, मुकुंद जोशी राजेंद्र भीलेगावकर बी एन कुलकर्णी दत्ता काळे भालचंद्र पाठक पी सी देशमुख नंदुसेठ देशमुख पत्रकार सुधीर नागापुरे प्रदीप कुलकर्णी अॅड. दिपक देशमुख, बप्पा देशमुख, सुधाकर देशमुख, गौरी देशमुख, राजेश्री आनंदगांवकर , निरंजन वाघमारे, डॉ अतुल निलेकर , यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply