माजलगाव
माजलगाव तालुक्यातील लऊळ नंबर 1 तांड्यावरील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवल्याची घटना रविवार दी 18 ऑक्टोबर रोजी घडली आहे.
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादी नुसार ते कामानिमित्त माजलगावला आले होते तसेच त्यांची पत्नी कापूस वेचण्यासाठी शेतात गेली असताना मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून तिला पळवले. मुलीच्या वडिलांनी दी 19 ऑक्टोबर रोजी अज्ञात इसमा विरुद्ध पोलिसात फिर्याद दिली नंतर घरी आल्यावर त्यांच्या मुलीला आरबाज शकूर शेख वय 21 रा. लऊळ याने पळवले असल्याची माहिती मिळाली यावरून दी 20 ऑक्टोबर रोजी आरबाज शकूर शेख विरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे.
प्रकरणात भारतीय न्याय संहिता 137(2) नुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवकते करतं आहेत.