स्नेहा वनवेच्या गाण्याची युवा प्रेक्षकांना भूरळ

जवानांसाठी गायलं गाणं 

बीड (प्रतिनिधी) शहरातील आदित्य आयुर्वेदिक महाविद्यालय येथे अंतिम वर्षे मध्ये शिकणारी विद्यार्थिनी स्नेहा वनवे हिने आपल्या भारत मातेच्या जवानांसाठी मराठी गाण गायलं आहे. या गाण्याला अगदी काही तासातच हजारो दर्शक मिळाले , कर्ज प्रेमाचा या गाण्याने अनेक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना उत्तेजीत झाले असून आपल मन सुन्न करणारं गाणं हे बीड जिल्ह्यातील तरुणीने गायलं आहे. जवानांसाठी गायलेल हे गाणं स्नेहा ने खूप मेहनतीने आणि जिद्दीने तयार करून गायले आहे.

अगदी कमी वयापासून आपल्याला अगळ्या वेगळ्या क्षेत्रात जाण्याचा निर्धार स्नेहा वनवे हिने घेतला अन् तिने दोन दिवसापूर्वी एका युट्युब चॅनेल वरती आपल गाणं प्रदर्शित केले अन् प्रेक्षकाला याची आवड निर्माण करून दिली असून मला आपला इतका प्रतिसाद मिळाला असून अजून मला अगदी आपल्या आवडीचे गाणे मला बनवता येतील असे स्नेहा वनवे हिने बोलताना सांगितले. आपल्या यूट्यूब चॅनल वरती मॉ प्रॉडक्शन या वरती असून आपण ही हे गाणं पहावे असे स्नेहा वणवे हिने सांगितले.

Leave a Reply