अहिल्यानगर
मनपा विद्युत विभागातील कर्मचारी धीरजसिंह राजपूत (25) हे शहरातील मुकुंद नगर परिसरात शासकीय कर्तव्यावर असताना शुक्रवारी दुपारी त्यांच्यावर दहा ते बारा जणांनी हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला असून कपाळावर टिळा लावल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचे समजतं आहे. दरम्यान तीन आरोपीना हैदराबाद येथून अटक करण्यात आले असून शहरात तनावाचे वातावरण आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना अहिल्यानगर मधे घडली आहे. शुक्रवारी नेहमी प्रमाणे धीरज कपाळावर टिळा लावून ड्युटी वर आले. मुस्लिम बहुल मुकुंद नगर परिसरात त्यांचे कामं सुरु होते त्यांच्या सोबत मनपातील इतर कर्मचारी सोबत होते. दरम्यान कपाळावर टिळा का लावला म्हणून दहा तें बारा लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी इतर कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला. या हल्ल्यात धीरज गंभीर जखमी झाला त्याला पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता रविवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला आहे. धीरजच्या मृत्यू नंतर शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी शहर बंद चे आवाहन केले. या वेळी आ. संग्राम जगताप यांनी गृह खात्यावर ताशेरे ओढून पोलिसांच्या कार्यशैली वर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने हिंदूंनी पोलिसांवर अवलंबून न राहता स्वतः मैदानात उतरावे असे आवाहन केले. दरम्यान मनपातील सर्व कर्मचाऱ्यांनी मुकुंद नगर परिसरात कामं करण्यास नकार देऊन कामबंद आंदोलन पुकारले आहे. रविवारी सायंकाळी फरार आरोपीतील मुस्तकीम सय्यद,मेहराज सय्यद,सिराज सय्यद या तिघांना हैदराबाद येथून अटक केले आहे इतर आरोपिंचा तपास सुरु असून मयत धीरजसिंह राजपूत यांच्या पत्नीने प्रशासनावर गंभीर आरोप करुन ज्या कब्रस्तानात धीरजला मारले तेथेच अंत्यसंस्कार करणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान अहिल्यानगर शहरात प्रचंड तणावाचे वातावरण असून हिंदू समाजाने आता महाराष्ट्रात टिळाही लावायचा नाही का असा प्रश्न बंद मधे सहभागी झालेल्या हिंदू कार्यकर्त्यांनी केला. उत्तर प्रदेश सारखी योगी स्टाईल महाराष्ट्रात हवी अशी मागणी हिंदू समाजा कडून होतं आहे.