वडवणीत हिंदु व्यापाऱ्यांच्या दुकानावर तुफान दगडफेक. 3 गंभीर जखमी सकळ हिंदू समाजाकडून आज वडवणी बंद.

वडवणी

गाडी पार्क करण्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत व दगडफेकीत हिंदू समाजातील तिघे गंभीर जखमी झाले असून सकळ हिंदू समाजाने आज वडवणी.जी बीड येथे बंदचे आवाहन केले आहे.

शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात गाडी पार्क करण्याच्या वादातून मारहानीला प्रारंभ झाला. या वेळी इस्माईल पठान याने शंभर जणांचा मोठा जमाव घेऊन प्रकरणाशी संबंध नसलेल्या इतर हिंदू समाजातील व्यापाऱ्यांच्या दुकानावर थेट दगडफेक सुरु केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने हिंदू व्यापारी तसेच ग्राहक भांबावले. या दगडफेकीत व हाणामारीत तिघे जन गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथे उपचार सुरु आहेत. घटनेनंतर सकळ हिंदू समाजातील व्यापाऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन गाठून आरोपीना तात्काळ अटक करण्याची मागणी करुन ठिय्या मांडला.आरोपी इस्माईल पठाण याच्यासह वीस ते पंचवीस लोक फरार असून घटनेच्या निषेधार्थ आज सकळ हिंदू समाज वडवणी कडून कडकडीत बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply