मुलीच्या केवळ एका स्टेटमेंट वरून तिचा ताबा जिहाद्याला दिला जाणार असेल तर देवेंद्रजी भविष्यात हिंदूंच्या घरा घरात लव्ह जेहाद घडणार. केज पोलिसांच्या भूमिकेवरून हिंदू समाजात तीव्र असंतोष.31जुलै ला हिंदू समाजाचा विराट मोर्चा.

केज

काही दिवसांपूर्वी केज शहरात घडलेल्या लव्ह जेहादच्या प्रकरनात पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेरून चांगलेच रनकंदन माजण्याचे चिन्ह असून 31 जुलै रोजी शहरात आमदार संग्राम भैया जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

केज शहरात दी 17 जुलै रोजी हिंदू धर्मातील एका मुलीचं घरातून अपहरण करण्यात आलं. मुलीच्या आईवडिलांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठले परंतु तिथे केवळ मिसिंग तक्रार घेण्यात आली. तक्रारीतही मुलीच्या पालकांनी अपहरण करणाऱ्या मुलाचे नाव दिले परंतु पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने तक्रारीतुन मुलाचे नाव वगळण्याचा अजब सल्ला आई-वडिलांना दिला असे समजते. दुसऱ्या दिवशी मुलीला पळवणाऱ्या मुस्लिम मुलाने जमावा सोबत पोलीस स्टेशन गाठून तिथे मुलीला त्याच्या बाजूने स्टेटमेंट द्यायला लावले. कर्तव्य दक्ष पोलिसांनीही तात्काळ मुलीला हज्जू शेखच्या ताब्यात दिले.

ज्या वेळी मुलीचं स्टेटमेंट घेण्यातं आले त्या वेळी आई-वडिलांच्या म्हणण्यानुसार मुलीची शारीरिक, मानसिक स्थिती सामान्य नव्हती. तिच्या पायावर, हातावर जखमा होत्या तिची पॅन्ट फाटलेली होती. एकंदर तिला मारहान झाल्याचे दिसतं असतानाही पोलिसांनी जखमी मुलीचं मेडिकल व चौकशी न करता तीच दोन वाक्याचं स्टेटमेंट घेऊन तिला शेख च्या ताब्यात दिले. मुलीचा ताबा मिळाल्या पासून शेख हज्जू संबंधित मुली समवेत फरार आहे.विशेष म्हणजे पोलिसांनी मुलीचा ताबा स्वतः कडे ठेऊन प्रकरणाचा अधिक तपास केला असता तर अपहरण, मारहाण, धर्मांतरण, बलात्कार, ब्लॅकमेल या सारखी कलमे हज्जू शेख विरुद्ध लागली असती तिथे या प्रकरणात अजून साधा गुन्हा (FIR) देखील दाखल झालेला नाही हे विशेष.

मुलीचं अपहरण तसेच तिला धमकावून, मारहाण करुन पोलिसांसमोर उभं केलं जाणार असेल व तिच्या केवळ एका स्टेटमेंट वरून तिचं अधिकृत लग्न झालेलं नसताना तिचा ताबा लव्ह जेहाद करणाऱ्या मुलाकडे दिला जाणार असेल तर भविष्यात हिंदूंच्या घरा घरात लव्ह जेहाद घडण्यास वाव आहे. मुख्य म्हणजे पोलिसांत एफ.आय.आर. दाखल नसल्याने कोणत्याही माध्यमाने त्यांच्यावर झालेल्या अन्याय,अत्याचारची बातमी छापून देखील आणली नाही हे विशेष.थोडक्यात लव्ह जेहाद करणे किती सोपे आहे हे केज येथील प्रकरनाने दाखवून दिले आहे.

मुलीच्या आईने केला आत्महत्येचा प्रयत्न.

मुलीच्या आई-वडिलांचा पोलीस प्रशासनावर खूप रोष आहे त्यांचं म्हणणं कुणीही ऐकून घेत नाही. सर्वजण मुलीच्या स्टेटमेंटचा दाखला देतात परंतु मुलीने कोणत्या अवस्थेत स्टेटमेंट दिल हे आई वडिलां शिवाय कुणालाही माहीत नाही.दोन दिवसांपूर्वी मुलीच्या आईने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. केज येथे घडलेल्या लव जिहाद प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी समस्त हिंदू समाज करत आहे येत्या 31 जुलै रोजी शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले असून सदरील मोर्चाला हिंदूंनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मुलीचे आई-वडील घेणार मुख्यमंत्र्यांची भेट!

दरम्यान या सर्व प्रकरणात मुलीचे आई-वडील लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या कडे व्यथा मांडणार असल्याचे समजते.

Leave a Reply