माजी केंद्रीय मंत्री बननराव ढाकणे यांचं निधन 

अहिल्यानगर: Babanrao Dhakane माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी गुरुवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात मागील काही आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

बबनराव ढाकणे हे मागच्या तीन आठवड्यापासून निमोनिया आजाराने त्रस्त होते. अहमदनगरमधील एका खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. हृदयविकाराच्या झटक्याने आज त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. बीड, अहिल्यानगर जिल्ह्यात बबनराव ढाकणे यांनी मोठं काम उभं केलं. पाथर्डीसाठी त्यांनी सामान्य लोकांच्या हितासाठी काम केलं.

 अल्पपरिचय

बबनराव ढाकणे यांचा जन्म  पागोरी पिंपळगावमधील सामान्य शेतकरी कुटुंबात  झाला.त्यांच्या घरात राजकीय वारसा नव्हता. पाथर्डीतील हिंद वसतिगृहात राहून त्यांनी शिक्षण घेतलं. नानासाहेब गोरे, सेनापती बापट, शिरू लिमये यांच्या नेतृत्वातील गोवा मुक्ती संग्रामातही बबनराव ढाकणे यांचा सक्रीय सहभाग होता. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडे ते ओढले गेले. 1958 साली यशवंतराव चव्हाण हे भगवानगडावर आले होते. तेव्हा बाशासाहेब भारदे आणि निऱ्हाळी यांची यांनी त्यांचा परिचय करून दिला अन् बबनराव ढाकणे काँग्रेसमध्ये सक्रीय झाले.

Leave a Reply