राहुल कोमटवार व ओम राठोड यांची बीड जिल्हा क्रिकेट संघात निवड!

माजलगाव (प्रतिनिधी) – येथील तरूण क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा संयमी खेळाडू राहुल कोमटवार व ओम राठोड याची कोल्हापुर येथे होणार्‍या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय यु. 16 क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

 

या संघात तरूण क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा उत्कृष्ट बॉलर चि. ओम रमेश राठोड व उत्कृष्ट बॅट्समन चि.राहुल विनोद कोमटवार यांनी त्सराव सामन्यात केलेल्या कामगिरीच्या जोरावर निवड निवड करण्यात आली. राहुलने व ओमने जिद्द व चिकाटीच्या बळावर स्थानिक स्पर्धेत नावलौकीक मिळवलेले आहे. राहुल वओम हा तरूण क्रिकेट कॅडमी, माजलगाव येथे प्रशिक्षण घेत असुन त्यांना शेख फेरोज सर व गोविंद टाकणखार यांचे मोलाचे मार्गदर्शन केले.

 

कोल्हापुर येथे होणार्‍या स्पर्धेत बीडकडून राहुल व ओम हे प्रतिनिधीत्व करणार आहे. या यशाबद्दल बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षिरसागर, सचिव अमोर सलिम, महेश वाघमारे, राजन साळवी, इरफान कुरेशी, मनोज जोगदंड, जावेद पाशा, रिजवान खान, सुनील गोपी शेट्टी, गोपाल गुरखुदे, आरिफ शेख, अतिक कुरेशी, अक्षय नरवडे, शाहरूख पठाण यांनी राहुल व ओम चे अभिनंदन केले आहे.

महा जागरण,maha Jagran,mahajagran, बातमी नव्हे तथ्य,

Leave a Reply