पुणे: ‘पुणे तेथे काय उणे’ असे पुण्याच्या बाबतीत म्हंटले जाते.पुणेकर कधी काय करतील याचा नेम नाही.त्यातही विषय गणपती बाप्पाचा असेल तर मग पाहायलाच नको.आता हेच पहा ना पुणेकरांनी चक्क गणपती बाप्पाला सुद्धा थंडी वाजू नये म्हणून स्वेटर घातले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कडाक्याची थंडी पडत आहे. दरवर्षीप्रमाणे थंडी वाढताच पुण्यातील सारसबाग येथील गणपती बाप्पाला सुद्धा स्वेटर परिधान करण्यात येते. त्यामुळे थंडी पडताच बाप्पाला स्वेटर परिधान करण्यात आले आहे. गणपती बाप्पा नी स्वेटर घातले म्हणजे कडाक्याची थंडी पडली आहे असे समजले जाते.