शेतकऱ्यांना आता दरवर्षी मिळणार बारा हजार रुपये! काय आहे ‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजना

पहिल्या टप्प्यासाठी १७२० कोटी निधी मंजूर; शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार …

मुंबई, दि. १२ : प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेतील पहिल्या हप्त्यापोटी १७२० कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित झाला आहेअशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.दीपावलीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा निधीचा पहिला हप्ता २००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे.

 

सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी‘ ही योजना उपमुख्यमंत्री व तत्कालीन वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केली होती. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी रुपये ६००० या अनुदानामध्ये राज्य शासनाच्या आणखी ६०००  इतक्या निधीची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना राबवण्यास जून 2023 मध्ये मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार या योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै २०२३  या कालावधीच्या पहिल्या हप्तापोटी १७२०  कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

 

Leave a Reply