मुंबई, ऑनलाईन : मुंबईत ओमायक्राॅनच्या नव्या व्हेरीयंटची पहिली केस समोर आली आहे. मुंबईत ओमायक्राॅनच्या XE नावाच्या नव्या व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. तिथेच ओमायक्राॅनच्या कप्पा व्हेरियंटची केसदेखील आढळली आहे. ज्या ३७६ रुग्णांची तपासणी करण्यात आली होती, त्यातील २३० रुग्ण मुंबईतील रहिवासी आहेत. सध्या या रुग्णांमध्ये कोणतीच गंभीर लक्षणे दिसलेली नाहीत. (XE Variant)
मुंबईच्या २३० रुग्णांमधील २१ रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला कोणताही रुग्ण रुग्णालयात भरती झालेला नाही. कोरोनाचे दोन्ही लसी घेतलेल्यांमधील ९ रुग्ण रुग्णालयात भरती झालेले आहेत. कोरोनाची लसीचा कोणताच डोस न घेतलेले १२ रुग्ण भरती झालेले आहेत. रुग्णालयात भरती झालेल्या २१ रुग्णांपैकी कोणताही रुग्ण ऑक्सिजन किंवा गंभीर परिस्थितीत नाही. (XE Variant)
जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात माहिती दिलेली आहे की, XE व्हेरियंट कोरोना हा कधीही सर्वात संक्रमक होऊ शकतो. XE हा एक पुन:संयोजन असून BA-1 आणि BA-2 ओमायक्राॅनचे म्युटेशन आहे. पुन:संयोजन तेव्हा निर्माण होते जेव्हा एकाच व्यक्तीच्या शरीरात अनेक प्रकारचे कोरोनाचे व्हेरियंट संक्रमित असतात. त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेले आहे की, “नव्या आलेला XE व्हेरियंट BA-2 च्या तुलनेत १० टक्क्याने अधिक संक्रमक आहे.” परंतु, या विधानाची अजुनही पुष्टी कऱण्यात आलेली नाही.
हे वाचा…