माजलगावात झळकले अतिक अहमदच्या समर्थनार्थ बॅनर;हिंदू संघटना आक्रमक!

माजलगाव दी 18 प्रतिनिधी

शहरातील मुख्य चौक असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात उत्तर प्रदेश मधील हत्या करण्यात आलेल्या अतिक व अश्रफ या गुंडांना श्रद्धांजलीचे बॅनर लावण्यात आले. दरम्यान बॅनर वरती हिंदू समाजा बाबत आक्षेपार्ह उल्लेख असल्याने हिंदू संघटना आक्रमक झाल्याने ते बॅनर हटवून आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

शहरातील डॉ आंबेडकर चौकात अतिक अहमद या गुंडाचे उदात्तीकरण करून त्यांना शहिद असे संबोधले तसेच त्यांना स्वर्गात जागा मिळावी यासाठी अल्लाकडे प्रार्थनाही करत असल्याचा उल्लेख मोहसीन पटेल मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आला दरम्यान या बॅनर वरती ते हिंदू नाहीत गांडू आहेत असे दैनिक लोकाशा मधे छापून आलेला विवादास्पद लेखही छापण्यात आल्याने हिंदू संघटना आक्रमक झाल्या. समस्त हिंदू बांधव व बजरंग दल व भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचे निवेदन दिले.दरम्यान पोलिसांनी आरोपीना अटक करून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

दैनिक लोकशाची होळी

सतत हिंदू विरोधी लिखाण करून जातीवादी गर्व ओळखणाऱ्या दैनिक लोकाशाची येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात होळी करण्यात आली. तसेच लोकाशाचे संपादक विजयराज बंब, व लेख लिहिणाऱ्या उपसंपादका विरूद्ध घोषणा बाजी करुन निषेध नोंदवला आहे. हिंदु धर्म बांधवांनी लोकशा वर बहिष्कार टाकावा असे आवाहन करण्यात आले.

 

Leave a Reply