संपादक भास्कर कुलथे यांचे दुःखद निधन

माजलगाव (प्रतिनिधी):दैनिक टाइम्सचे माजी सहसंपादक भास्कर कुलथे यांचे उपचारादरम्यान शुक्रवार दि.2 रोजी रात्री 11 वाजता दुःखद निधन झाले.संपादक प्रभाकरराव कुलथे,पत्रकार कमलाकर कुलथे पत्रकार दिनकर,कुलथे,पत्रकार रत्नाकर कुलथे यांचे ते बंधू होते. मृत्यू समयी त्यांचे वय 63 वर्षे होते.शनिवारी दुपारी 12:30 वाजता त्यांच्या पार्थिवावर सिंदफणा तीरावरील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आला. त्यांच्या पश्चात भाऊ,पत्नी,दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे.

Leave a Reply