विजेचा शॉक लागून मुलाचा मृत्यू; माजलगावातील घटना
माजलगाव, दी. १८(प्रतिनिधी): झेंडा चौक भागातील वेंकटेश सचिनराव कोंडावार ( वय १६) या हुशार व सुसंस्कारित मुलाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची वेदनादायी व धक्कादायक घटना घडली आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, शहरातील झेंडा चौक भागात राहणारा वेंकटेश सचिनराव कोंडावार हा येथील महाविद्यालयात ११ वी मध्ये शिक्षण घेत होता.आज सकाळी बांधकामावर पाणी मारण्यासाठी विजेची मोटर सुरू करताना त्यास विजेचा जबर शॉक लागला. यातच त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे