Crime News : अमरावतीत 180 मुलींना जाळ्यात ओढलं, हॉटेलवर शरीरसंबंधांचे 350 व्हिडिओ, मुलींना मुंबई-पुण्यात विकण्याचा कट.आय. टी जेहाद नंतर आता…

अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांमध्ये एकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून अनेक युवतींचे लैंगिक शोषण केल्याची घटना सोमवारी समोर आली. विशेष म्हणजे, या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.मोहम्मद आयान व मोहम्मद झोयान आरोपी फरार झाले आहेत.

भाजपने सुमारे १८० हून अधिक मुलींचे साडेतीनशे व्हिडिओ असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.  आय. टी. जेहाद गाजत असतानाच हा नवा प्रकार आल्याने संताप व्यक्त होत आहे.

ब्लॅकमेल करुन शरीरसंबंधांचे व्हिडिओ

या घटनेतील संशयित आरोपीने युवतींसोबत शरीरसंबंधाचे व्हिडिओ स्वत:च चित्रित केले होते. हे व्हिडिओ फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये पीडित तरुणींची असहायता स्पष्टपणे दिसून येत असल्याने ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून त्याने अनेकींचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणात केवळ एकच आरोपी नसून, त्याचे काही साथीदारही असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आरोपी कुटुंबासह घरातून पसार

हे पाशवी कृत्य चव्हाट्यावर येताच संशयित आरोपी कुटुंबासह घरातून पसार झाला आहे. सध्या त्याच्या घराला कुलूप असून, पोलिसांसमोर या प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. अद्याप कोणतीही पीडिता समोर आलेली नाही. मात्र, व्हायरल व्हिडिओ हाच पुरावा मानून पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

परतवाडा प्रकरणाबाबत खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी लेखी निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली आहे. त्यांनी निवेदनात महंमद अयान आणि महंमद झोयान या दोन युवकांवर गंभीर आरोप केले असून, त्याआधारे पोलिसांनी तातडीने चौकशी चक्रे फिरवली आहेत. सध्या दोन्ही संशयित आरोपींचा शोध सुरू असून, ते ताब्यात आल्यानंतर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
मुंबई-पुण्यासारख्या शहरांत विकण्याचा कट

‘या प्रकरणात अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत असल्यास पीडितांनी न घाबरता पोलिसांकडे दाद मागावी. हे प्रकरण संवेदनशील असल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सामाजिक सलोखा राखावा,’ असे आवाहन अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी केले आहे.

‘सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून हॉटेलमध्ये त्यांचे चित्रीकरण केले जाते. यातील अनेक मुलींना मुंबई-पुण्यासारख्या शहरांत विकण्याचा कट रचला जात असून, विरोध करणाऱ्या मुलींना व कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा दावा खासदार बोंडे यांनी केला आहे.

Leave a Reply