लव्ह जेहादच्या प्रकाराने बीड हादरले. केज पोलिसांनी मुलीला दिले मुलाच्या ताब्यात.हिंदू समाजात तीव्र असंतोष

लव जिहादच्या प्रकाराने जिल्हा पुन्हा एकदा हादरला असून केज  शहरात द्वितीय वर्षात शिकणाऱ्या एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून हज्जू शेख नावाच्या इसमाने पळवून नेले.मुलीच्या केवळ एका स्टेटमेंटच्या आधारे केज पोलिसांनी सदरील मुलीला मुलाच्या ताब्यात दिल्याने प्रकरणावर संशय व्यक्त होत आहे.

मुलीच्या आई-वडिलांनी सदरील प्रकरणात केज पोलिसात रीतसर सर तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी केवळ दी 17 जुलै रोजी केवळ मिसिंग रिपोर्ट दाखल करुन घेतला.मुलगी सज्ञान असल्याकारणाने मुलीचे स्टेटमेंट घेऊन त्या मुलीचा ताबा हज्जू शेख याच्या कडे देण्यात आला आहे. मुलीच्या आई वडिलांनी समाज माध्यमावर दिलेल्या स्टेटमेंट च्या अनुसार त्यांच्या मुलीला मारहाण करण्यात आली असून तिच्या पायावर रक्ताचे डाग दिसलें होते मुलीवर स्टेटमेंट देण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचेही तिच्या आई-वडिलांनी सांगितले आहे. दरम्यान मुलगी गायब झाल्यावर  तिला पोलीस स्टेशनमध्ये हजर केले केवळ एका स्टेटमेंट वर तिला संबंधित मुलाच्या ताब्यात दिल्याने पोलिसांच्या विषयी संशय व्यक्त होतं आहे.

लग्न न झाल्यास मुलीचा ताबा कुणाकडे असतो?

केज शहरात घडलेल्या या प्रकाराने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे काही महिन्यांपूर्वी माजलगाव शहरातही एका कॅफे मध्ये मुलीवर अत्याचार करण्यात आला होता.केज शहरात घडलेल्या या घटनेनंतर जिल्हा लव जिहादच्या प्रकरणाने पुन्हा ढवळून निघाला आहे. मुलीने मुलाच्या बाजूने स्टेटमेंट दिले परंतु लग्न न करता मुलीचा ताबा मुलाकडे देता येऊ शकतो का?मुलीवर धर्मांतर करण्याचा दबाव तर नव्हता ना? मुलीला ब्लॅक मेल तर करतं नव्हते ना? याशिवाय इतर अनेक प्रश्न अनुत्तरीत असताना पोलिसांनी मुलीचा ताबा मुलाकडे दिल्याने प्रकरण गुंतागुंतीचे बनले आहे. प्रकरणाचा पूर्ण तपास न करता दबावात असलेल्या मुलीच्याकेवळ एका स्टेटमेंट वर तिचा ताबा मुलाकडे दिला जात असेल तर इथून पुढे चुकीचा पायंडा पडण्याची दाट शक्यता आहे. पोलीस तपासात अनेक गोष्टी उघड होऊ शकतात असे मुलीच्या आई वडिलांचे म्हणणे आहे. लवकरच या विषयावर केज शहरात हिंदू समाजाचा अति विराट मोर्चा निघणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

 

Leave a Reply