माजलगाव,( प्रतिनिधी): – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती – उपसभापती निवड कार्यक्रम आज (दि.१४) रविवारी बाजार समिती कार्यालयात पार पडला. यामध्ये सभापतीपदी जयदत्त नरवडे तर उपसभापतीपदी श्रीहरी मोरे यांची निवड झाली.
माजलगाव बाजार समितीची निवडणूक आ.प्रकाश सोळंके व भाजप मोहन जगताप यांनी अत्यंत अटीतटीची केली होती. मात्र आ.सोळंके यांनी आपली सत्ता कायम राखत १८ पैकी १२ जागांवर विजय मिळवला होता. तर जगताप यांच्या पॅनेलचे ३ उमेदवार विजयी झाले, माजी आ.राधाकृष्ण होके पाटील यांच्या गटाचे २ तर अपक्ष १ असे उमेदवार विजयी झाले होते. आज (दि.१४) सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. आ.सोळंकेकडून सभापती करिता जयदत्त नरवडे तर उपसभापती करिता श्रीहरी मोरे यांचे अर्ज तर मोहन जगताप यांच्याकडून सभापती करिता नितीन नाईकनवरे तर उपसभापती करिता मनोज जगताप यांचे अर्ज दाखल झाले होते. परंतू नाईकनवरे व जगताप आपले अर्ज वापस घेतले.
यामुळे सभापतीपदासाठी जयदत्त नरवडे तर उपसभापतीपदी श्रीहरी मोरे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या निवड होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.