पुणे: “पवारांना कोलत कोलतच मी राजकारणात आलोय” असे खरमरीत प्रतिउत्तर भाजपचे आमदार तथा प्रदेश प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांनी आ. रोहित पवार यांना दिले.
राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार तथा शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधताना असे म्हटले होते की,”राजकारणात राहायचं असेल तर पवारांच्या नादी लागू नका…!”
दरम्यान,आज गोपीचंद पडळकर एका अकादमीच्या कार्यक्रम निमीत्त पुण्यात आले होते. कार्यक्रम संपल्या नंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवार यांनी केलेल्या टिके संदर्भात विचारले असता “अशा पवारांना कोलत कोलतच मी राजकारणात आलोय!” असे खरमरीत प्रतिउत्तर त्यांनी दिले.
पुढे बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, रोहित पवार यांनी आजोबा शरद पवार यांना विचारले पाहिजे की, तुम्ही आतापर्यंत किती लोकांची घरे फोडली? किती लोकांवर प्रादेशिक अन्याय केला? जातीयवाद कसा पसरवला?
गोपीचंद पडळकर हे भाजपचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जातात. शरद पवार यांची घराणेशाही, त्यांच्याकडून होणाऱ्या चुका याबाबत ते सतत आवाज उठवतात.