महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या उपाध्यक्षपदी आ.प्रकाश सोळंके

मुंबई,दि. ९ (बातमीदार): माजलगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा माजी मंत्री आणि लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक मार्गदर्शक आ. प्रकाश सोळंके यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि, मुंबई च्या संचालक पदावर दिनांक १०/ ११ / २०२२ रोजी बिनविरोध निवड झालेली होती. नुकतीच मागील महिन्यात महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबईच्या सन २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीसाठी निवडणुक प्रक्रिया पार पडली. श्री. जे. डी. पाटील अध्यासी अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, मुंबई याचे अध्यक्षतेखाली दि. ०७ / १२ / २०२२ रोजी साखर संघ, मुंबई कार्यालयात नवनिर्वाचीत संचालक मंडळाची बैठक आयोजीत करण्यात आलेली होती. या बैठकीत संघाचे अध्यक्ष म्हणून पांडूरंग पाटील, चेअरमन राजारामबापू पाटील कारखाना सांगली, उपाध्यक्ष म्हणून आ. प्रकाशदादा सोळंके आणि श्री. प्रतापरावजी ओव्होळ चेअरमन, भाऊसाहेब थोरात सह. सा. का. अहमदनगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार साहेब व संघाचे माजी अध्यक्ष श्री. जयप्रकाश दांडेगावकर यांची उपस्थिती होती.

 

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या माध्यमातुन सहकारी साखर कारखान्याची गुणवत्त वाढ, शेतकरी व साखर उद्योगांच्या समस्या, कारखान्यास वित्त पुरवठयातील व्यवहारीक अडचणी, साखर निर्यातीचे प्रश्नासंबंधी केंद्र व राज्य शासनाकडे प्रभावीपणे काम महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघामार्फत केले जाते. मा. आ. श्री. प्रकाशदादा सोळंके यांची उपाध्यक्ष पदी झालेल्या निवडीबद्यल कारखान्याचे चेअरमन श्री. धैर्यशील सोळंके, कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद त्याचबरोबर कार्यकारी संचालक श्री. एम. डी. घोरपडे आणि सर्व अधिकारी,कर्मचारी, कामगार यांचेकडुन अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply