संजय राऊत यांच्या अज्ञानीपणाचे दर्शन आज महाराष्ट्राला झाले…

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल चुकीची माहिती देऊन तुम्ही काय मिळवता आहात?”

मुंबई: भाजपा फायर ब्रँड महिला नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना(ठाकरे गट) चे राज्यसभा सदस्य खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊतांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला होता, असं म्हटल्याचं समोर आलं आहे. यावरून चित्र वाघ यांनी ट्वीटद्वारे संजय राऊतांवर टीका केली आहे.

 

ट्विटर हॅण्डल द्वारे टीका करताना त्या म्हणाल्या, “रोज सकाळी महाराष्ट्राला ज्ञान देणारे सर्वज्ञानी इतके अज्ञानी असतील, याचं दर्शन आज महाराष्ट्राला झालं आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात नाही, मध्य प्रदेशमधील महू येथे झाला आहे. इतकं सामान्य ज्ञान असू नये? आमचे आदर्श असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन तुम्ही काय मिळवता आहात?”

याशिवाय, “अशा पद्धतीने राष्ट्रपुरुषांचा अपमान तुम्ही करायचा आणि मोर्चेपण तुम्ही स्वत:च काढायचे, मूर्ख समजू नका महाराष्ट्र तुम्हाला पुरता ओळखून आहे, तुमचा जाहीर निषेध.” असंही चित्रा वाघ यांनी ट्विटरवरील व्हिडीओत म्हटलं आहे.https://twitter.com/ChitraKWagh/status/1603371992518131713?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1603371992518131713%7Ctwgr%5Ee989daf80c297389edb9a724bc994a551e2c8f0d%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Fchitra-wagh-criticizes-sanjay-raut-for-saying-that-dr-babasaheb-ambedkar-was-born-in-maharashtra-msr-87-3337898%2F

Leave a Reply