मुंबई: चीन येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस विभागात भारतीय धावपटू अविनाश साबळे याने स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
बीडचा सुपुत्र अविनाश साबळे याने स्टीपलचेस मध्ये सुवर्णपदक पटकावल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.भारताचे दिवसभरातील हे दुसरे सुवर्णपदक आहे.आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला १२ सुवर्ण पदक मिळाले आहेत त्याबद्दल अविनाश साबळे आणि भारतीय खेळाडूंचे महा जागरण परिवाराकडून मनःपूर्वक अभिनंदन.
“अविनाश, तुझ्या ऐतिहासिक विजयाचा महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला सार्थ अभिमान आहे”, या शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अविनाश चे अभिनंदन केले आहे.