नेकनूर मधे एकट्या महिलेला जमावा कडून मारहाण. बाळालाही नाही सोडले. 31 जनांवर गुन्हा 10अटकेत

 

नेकनूर

पाटोदा तालुक्यातील वाघेरा येथील विवाहिता अनिता तुकाराम जगताप ही बीड येथून तिच्या पणजीला भेटून नेकनूर मार्गे बाळापुर कडे माहेरी जात असताना त्यांची रिक्षा नेकनूर बस स्थानकासमोर आल्यानंतर शनिवारी सायंकाळी सहा वाजता अदनान खानने रिक्षाला मागून धडक मारली. स्कुटी चालकाने रिक्षाला धडक देऊन तो रागारागाने रिक्षा कडे चालत आला त्यांनी रिक्षा चालकाला मारहाण केली मारहाण होत असल्याचे पाहून स्कुटी चालकाचे ईतर सहकारी  त्या ठिकाणी एकत्र आले या सर्वांनी रिक्षा मधील अनिता तुकाराम जगताप तिचे बाळ व अन्य दोन महिलांना मारहाण सुरू केली. मारहाण करणाऱ्यांनी महिला व तिच्या बाळालाही सोडले नाही.

रिक्षा चालकांनी घडलेल्या प्रकाराबद्दल संपूर्ण माहिती सांगितली मठामध्ये सप्ताह चालू आहे त्यामुळे मी तिकडे चाललो होतो धक्का लागल्याने मला मारहाण केली यावेळी माझ्या बहिणीलाही मारहाण केली लहान लेकरांनाही त्यांनी सोडलं नाही असं रिक्षाचालक रंजीत लोखंडे यांनी सांगितले.

जमावाकडून महिलेला मारहाण झाल्याचे समजताच नेकनूर मधील नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला या ठिकाणीही महिलेला मारहाण करणारा गट पुन्हा समोर आल्याने दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन दगडफेकही झाली या प्रकरणात अदनान खान, वाजेत खान, सय्यद सादाद खान, सय्यद नुसरत, आली पठाण, साहेब शेख, आयन रईस,शेख अमन,शेख अखिल,शेख सलीम, अजय काळे, दशरथ राऊत यांच्यासह इतर दहा जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत दरम्यान एकट्या महिलेला जमावाने केलेल्या मारहाणीची बातमी समजतात संपूर्ण जिल्हाभर संतापाची लाट आहे

 

एकूण तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आतापर्यंत एकूण दहा आरोपी अटक करण्यात आले आहेत सध्या नेकनूर मध्ये शांतता आहे या ठिकाणी आरसीपीच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या असून केज उपविभागाने बंदोबस्त वाढवला आहे सीसीटीव्हीचे परीक्षण करून महिलांना मारहाण करणारे गुन्हेगार निष्पन्न केले जातील.

– सचिन पांडकर अप्पर पोलीस अधीक्षक बीड

Leave a Reply