माजलगाव येथील लव्ह जिहाद पीडितेचा न्यायालयात जवाब मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता.

काही दिवसांपूर्वी माजलगाव शहरातील बेकर्स लॉंज या कॅफे मधे एका तरुणीवर अत्याचार झाला. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलीच्या आईने केलेल्या तक्रारी नंतर आरोपी अरमान रहीम शेख रा. इंदिरा नगर माजलगाव याच्या विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला. पीडित मुलीने आई सोबत पोलीस स्टेशन येथे जाऊन जवाब दाखल केला. यानंतर आज पीडित अल्पवयीन मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याचारा बाबत माजलगाव जिल्हा सत्र न्यायालयात जवाब दिला आहे.

माजलगाव शहरात घडलेल्या घटने नंतर संपूर्ण जिल्हा हादरून गेला प्रकरणाला लव्ह जेहादचा कंगोरा आहे.आज पीडित मुलगी जवाब देण्यासाठी डी. वाय. एस. पी. कार्यालयात दाखल झाली तपास अधिकारी महेश भोसले यांनी पीडित मुलीचा जवाब घेतला यानंतर काल दुपारी माजलगाव जिल्हा सत्र न्यायालयात पीडित मुलीने तिच्यावर कॅफे मधे कशा प्रकारे अत्याचार झाला. घटनेत कोण कोण सहभागी होते याबाबत सविस्तर जवाब दिला आहे. सदरील पीडित मुलगी तिच्या आई सोबत पोलीस संरक्षणात न्यायालयात हजर झाली होती.

माजलगावात लव्ह जिहादचे रॅकेट

मागील काही महिन्यात घडून गेलेल्या घटनांपासून माजलगाव हे तपास यंत्रणाच्या हिट लिस्ट वर आल्याचे दिसते. दोन महिन्यापूर्वी गुलजार ए रजा या सेवाभावी संस्थेने धर्माच्या नावाखाली निधी गोळा केला होता.या घटनेचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे असून या प्रकरणात दोघांना अटक केली आहे नुकत्याच घडलेल्या लव जिहाद प्रकरणाचा या प्रकरणाशी संबंध असू शकतो. एटीएस ने नाशिक व अमरावतीच्या येथे घडलेल्या लव्ह जेहाद प्रकरणाचा तपास त्यांच्या हाती घेतला आहे. माजलगाव येथील घटनेचा तपासही दहशतवाद विरोधी पथकानेचं करावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आल्याचे समजते.

एकूण किती मुली अडकल्या?

माजलगावात घडलेल्या या घटनेने राज्य हादरले आहे.शहरात अनेक कॅफे असून या कॅफे मधे रेंट वरती रूम मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. बेकर्स अँड लॉज येथे उघडकीस आलेली घटना केवळ हिमनगाचे टोक असून अनेक मुली यात अडकल्याची भीती व्यक्त होतं आहे. शहरातील प्रत्येक कॅफेचा मागच्या महिन्याचा सीसीटीव्ही चेक केल्यास अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस येऊ शकतात असे नागरिकांनी सांगितले आहे.

हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरणार.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात  घडलेली अत्याचाराची घटना धक्कादायक आहे आज माजलगाव शहरात मुली सुरक्षित नाहीत यामुळे हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरून मुलींना संरक्षण देणार असल्याचे बजरंग दल ने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply