गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यातील नेकनुर,माजलगाव अंबाजोगाई, उमापूर व जिल्ह्यातील अनेक भागात हिंदू टार्गेट होत असून जिल्हा पोलीस अधीक्षक आरोपींवर कठोर कारवाई करणे ऐवजी हिंदूंनाच टार्गेट करत आहेत त्यांची मुख्यमंत्र्यांकडे रीतसर तक्रार करणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले हिंदूंनी जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली असून जिल्ह्यातून कुठूनही फोन लावा तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी दहा मिनिटात पोहोचणार असल्याचे संग्राम जगताप यांनी सांगितले.
आज ब्रह्मगाव येथे हनुमानाच्या मूर्तीवर गोमास व रक्त लावल्याच्या निषेधार्थ हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी आमदार संग्राम जगताप आमदार गोपीचंद पडळकर हिंदवी स्वराज्याचे सरनोबत हंबीरराव मोहिते यांचे थेट वंशज धवलसिंह मोहिते-पाटील, अंबादास अंभोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी शहरातून काढलेल्या मोर्चात हिंदूंचा प्रचंड जनसैलाब उसळला होता मूर्तीवर गोमास लावल्याप्रकरणी पोलिसांनी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या अनेक हिंदू कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याने हिंदू समाजात पोलिसांविषयी प्रचंड असंतोष आहे आतापर्यंत केवळ एकच आरोपी अटक झाला असून इतरांनाही तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी मोर्चेकर्यांनी केली. याप्रसंगी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी पोलीस प्रशासन व जिल्हा पोलीस अधीक्षकांवर तोफ डागली पुढे बोलताना पडळकर म्हणाले की एक माणूस गाईची कत्तल करू शकत नाही या पाठीमागे अनेक लोक असून पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करावी, जिल्हा पोलीस अधीक्षक हे आरोपींवर कठोर कारवाई करणे ऐवजी हिंदू कार्यकर्त्यांनाच टार्गेट करत आहेत मी मुख्यमंत्र्यांकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांची रीतसर तक्रार करणार असल्याचे यावेळी गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले आमदार संग्राम जगताप यांनी हिंदूंना जशास तसे उत्तर देण्याचे खुले आव्हान करून जिल्ह्यातील अडचणीत सापडलेल्या हिंदूंनी मला फोन लावावा त्यांच्या रक्षणासाठी दहा मिनिटात पोहोचणार असून ब्रह्मगावातील हिंदूंनी संख्येने कमी आहोत हा गैरसमज मनातून काढून टाकावा त्यांच्या पाठीशी राज्यातील तमाम हिंदू उभा असून त्यांनी आता जशास तसे उत्तर द्यायला हवे असे आव्हान आमदार संग्राम जगताप यांनी केले. याप्रसंगी हिंदवी स्वराज्याचे सरनोबत हंबीरराव मोहिते पाटील यांचे थेट वंशज धवन सिंह मोहिते पाटील यांचेही आक्रमक भाषण झाले. जन आक्रोश मोर्चासाठी गेवराई तालुक्याच्या प्रत्येक गावातून हजारो हिंदू बांधव उमापूर मध्ये दाखल झाले होते.