देशातील पहिला घर वापसी दिन लातूर मध्ये साजरा.नेतोजी पालकरांना…

 

लातूर

लातूर येथील ‘जीवराज भवन’ येथे कल्चरल रिसर्च अँड स्टडी सेंटर लातूर व वीर योद्धा संघटना यांनी दिनांक १९ जून २०२६ रोजी सनातन हिंदू पुनर्प्रवेश दिन साजरा केला.

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक योद्धा नव्हते तर ते एक महान धर्मरक्षक आणि द्रष्टा युगपुरुष होते. १९ जून १६७६ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रमी सेनापती नेताजी पालकर यांचे शुद्धीकरण करून महम्मद कुलीखान चा पुन्हा नेताजी पालकर म्हणून सनातन हिंदू धर्मामध्ये पुनर्प्रवेश करून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या मुलीचे नेताजी पालकर यांच्या पुतण्या सोबत लग्न लावले व रोटी बेटी व्यवहार करून एक आदर्श समाजासमोर ठेवला. प्रमुख वक्ते म्हणून *सच्चिदानंदजी आहेर* शिवशंभु विचार मंच पुणे महानगर संयोजक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतांमध्ये डॉ. व्यंकट कोलपुके यांनी स्टडी सेंटरच्या स्थापना व कामकाजा मागचा उद्देश भारतीय इतिहासाचे वास्तव व सत्य समाजासमोर मांडणे आणि इतिहासातील घटनेकडे समाजाला निकोपपणे बघण्याची दृष्टी देणे असे सांगितले. प्रमुख पाहुणे ॲड. जोगेंद्रसिंहजी चव्हाण यांनी धर्मांतरणाची समस्या व घर वापसी मध्ये येणाऱ्या कायदेशीर अडचणीवर उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये लक्ष्मीकांत परांडेकर, श्रीकांत रांजणकर, संजय कांबळे, आनंद अग्रवाल, मनोज सूर्यवंशी, प्रदीप मोरे, दिलीपचंद चोपडा, नामदेव व्यंजने यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply