नसरापूर प्रकरण: कोर्टाचा निकाल लागताच चिमुकलीचे मम्मी-पप्पा धाय मोकलून रडू लागले, न्यायाधीशाने आरोपीला विचारले तुला…

पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात कोर्टाने मोठा निकाल दिला आहे. कोर्टाने नराधम आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवलं आहे. अवघ्या ५५ दिवसांत कोर्टाने हा निकाल दिला आहे.

हा निकाल ऐकताच कोर्टात उपस्थित असलेल्या चिमुकलीच्या आई वडिलांना अश्रूंचा बांध फुटला. ते कोर्टात धाय मोकलून रडायला लागले. त्यांना स्वत:चे अश्रू आवरता येत नाहीत. अगदी सुनावणीला सुरुवात झाल्यापासूनच त्यांना अश्रू अनावर झाले.

नेमकं प्रकरण काय आहे?

काही दिवसांपूर्वी भीमराव कांबळे याने अवघ्या तीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. पीडित मुलगी आपल्या घरासमोर काही मैत्रिणींसोबत खेळत होती. यावेळी भीमराव कांबळे याने पीडितेला खाऊ देण्याचं आमिष दाखवून उचलून नेलं. एका गोठ्यात घेऊन जात नराधमाने तिच्या शरीराचे लचके तोडले. तिने स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र नराधम कांबळेंन तिला सोडलं नाही.

शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर तब्बल १८ जखमा आढळल्या आहेत. १९ मिनिटांत या अठरा जखमा दिल्याचं तपासात समोर आलं आहे. हीच बाब अधोरेखित करत कोर्टाने कांबळेला अनेक सवाल केले आहेत. चिमुकलीने स्वत:ला वाचवण्याचा किती प्रयत्न केला असेल, तुला दया आली नाही का? असा प्रश्नही न्यायालयाने आरोपीला विचारला. शिवाय त्याने मुलीच्या मृत्यूनंतरही तिच्यावर अत्याचार केल्याचं कोर्टानं निरीक्षण नोंदवलं आहे.

या प्रकरणी कोर्टाने आरोपीलाच तुला काय शिक्षा द्यायची असा प्रश्न विचारला. त्याच्यासमोर तीन पर्याय ठेवण्यात आले, पहिला पर्याय म्हणजे फाशीची शिक्षा, दुसरा पर्याय आजीवन कारावास आणि तिसरी शिक्षा म्हणजे २० वर्षांची शिक्षा… कोर्टाने शिक्षेबाबत विचारलं असता, आरोपीनं पुन्हा आपण हा गुन्हा केला नाही. तिला मारलं नाही. आपण तिला घेऊन जात असताना घसरून पडलो, यातच तिचा मृत्यू झाल्याचा दावा केला. पण कोर्टाने तुझ्यावरील आरोप सिद्ध झाल्याचं सांगत त्याची कानउघडणी केली.

Leave a Reply