लव्ह जेहादच्या घटनेने माजलगाव हादरले अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग .गुन्हा दाखल

माजलगाव

संपूर्ण राज्य लव्ह जेहादच्या घटनांनी हादरले असताना याचे लोण ग्रामीण भागातही पसरले आहे. आज माजलगाव शहरातील एका कॅफे मधे मुलीवर अतिप्रसंग करताना एका युवकाला हिंदू तरुणांनी पकडले. चौकशी केली असता सदरील लव्ह जेहादचे प्रकरण असल्याचे निष्पन्न झाले असून मुलावर गुन्हा दाखल करण्या साठी पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठून मुला विरुद्ध रीतसर तक्रार दिली आहे.

माजलगाव शहरात ग्रामीण भागातील अनेक मुली शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेण्या साठी येतात. सदरील पीडित मुलगी ग्रामीण भागातील असून सुंदरराव सोळंके महाविद्यालयात इयत्ता अकरावी मधे शिक्षण घेत आहे. मुलीचे आई वडील मजुरी करतात. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना पीडित मुलीच्या मैत्रणीने आरोपी सोबत ओळख करुन दिली. एकमेकांना शैक्षणिक साहित्याची देवाण घेवाण करण्याच्या माध्यमातून मैत्रिणीने सदरील मुलीला एका कॅफे मधे बोलावून घेतले. संबंधित मुलगी कॅफे मधे गेली असता तिथे तिला तिची मैत्रीण भेटली नाही परंतु तिथे आरोपी अरमान रहीम शेख आधीच बसला होता. त्याने पीडित मुलीला पकडून तिच्या सोबत अति प्रसंग केला.कॅफेतील काही तरुणांच्या ध्यानात ही गोष्ट येताच त्यांनी त्या मुलाच्या तावडीतून मुलीला सोडवले व पोलिसांना पाचारणं केले. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी  अरमान रहीम शेख राहणार इंदिरानगर माजलगाव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 74,75,79
बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा 8,12, 126(2) नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

मुलाच्या हातात दोरी,गंडे,कलावा

प्रकरणातील आरोपी अरमान रहीम शेख याच्या हातात दोरे, गंडे व कलावा दिसून आल्याने खोलवर तपास केल्यास अधिक धागेदोरे मिळू शकतात असे दिसते.
,

Leave a Reply