नाशिक, अमरावतीनंतर जालना हादरलं! साहिल अन्सारीचं विकृत कृत्य; अट्रॅसिटी दाखल

नाशिक, अमरावती नंतर जालना शहरात ही एक अत्यंत धक्कादायक संतापजनक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्याची धमकी देत एका महाविद्यालयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला बुरखा घालायला लावून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याची घटना कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिल्लतनगर परिसरात घडली.

या घटनेने शहरात एकच खबळ उडाली आहे.

तरुणीवर अत्याचार, जालना हादरलं

शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीची ओळख तिच्याच वर्गातील साहिल अन्सारी या तरुणासोबत झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात करत, “तू होकार दिला नाहीस तर मी आत्महत्या करेन,” अशी धमकी देत आरोपीने तरुणीला आपल्या जाळ्यात अडकवले. यानंतर आरोपीने तरुणीला बुरखा घालण्यास भाग पाडले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून तिचा विश्वास संपादन केला.

दोन दिवसांपूर्वी या तरुणाने महाविद्यालय परिसरातून तिला बुरखा घालून आपल्या राहत्या घरी नेले आणि तिच्यावर बळजबरी करत बलात्कार केला. तिने विरोध केला असता तिला जातीवाचक शिवीगाळ करून तिला धमकावल्याचेही तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हंटल आहे. साहिल अन्सारी याने आपल्यावर बलात्कार केल्याची माहिती तरुणीने आईला सांगितल्यानंतर कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ कारवाई करत आरोपी साहिल अन्सारी याला मध्यरात्री 2 सुमारास त्याच्या राहत्या घरातून अटक करून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली.

पोलीस तपास सुरु

त्याची आई गावी गेल्याची संधी साधून त्याने हा प्रकार केल्याचेही तपासात समोर आलं असून त्यांनी तरुणीला जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही समोर आले आहे. यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वयेही गुन्हा दाखल करण्यासाठी कदीम जालना पोलिसांनी विभागीय पोलिस अधीक्षक अनंत कुलकर्णी यांच्याकडे वर्ग केला असून या प्रकरणी अधिक तपास ते करत आहे. नाशिक,अमरावती आणि आता जालना येथे घडलेल्या या घटनांमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणात कुठलं रॅकेट तर नाही ना याचा अधिक तपास पोलिस करत

Leave a Reply