लव्ह जेहादच्या घटनेने माजलगाव हादरले अल्पवयीन मुलीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात.गुन्हा दाखल

माजलगाव

संपूर्ण राज्य लव्ह जेहादच्या घटनांनी हादरले असताना याचे लोण ग्रामीण भागातही पसरले आहे. आज माजलगाव शहरातील एका कॅफे मधे मुलीवर अतिप्रसंग करताना एका युवकाला हिंदू तरुणांनी पकडले. चौकशी केली असता सदरील लव्ह जेहादचे प्रकरण असल्याचे निष्पन्न झाले असून मुलावर गुन्हा दाखल करण्या साठी पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठून मुला विरुद्ध रीतसर तक्रार दिली आहे.

माजलगाव शहरात ग्रामीण भागातील अनेक मुली शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेण्या साठी येतात. सदरील पीडित मुलगी ग्रामीण भागातील असून सुंदरराव सोळंके महाविद्यालयात इयत्ता अकरावी मधे शिक्षण घेत आहे. मुलीचे आई वडील मजुरी करतात. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना  या पीडित मुलीच्या मैत्रणीने आरोपी अरमान रहीम शेख रा. इंदिरा नगर माजलगाव या मुला सोबत ओळख करुन दिली. एकमेकांना शैक्षणिक साहित्याची देवाण घेवाण करण्याच्या माध्यमातून सदरील मुलीला एका कॅफे मधे बोलावून घेतले. संबंधित मुलगी कॅफे मधे गेली असता तिथे तिला तिची मैत्रीण भेटली नाही परंतु तिथे आरोपी अरमान रहीम शेख आधीच बसला होता. त्याने पीडित मुलीला पकडून तिच्या सोबत अति प्रसंग केला.कॅफेतील काही तरुणांच्या ध्यानात ही गोष्ट येताच त्यांनी त्या मुलाच्या तावडीतून मुलीला सोडवले व पोलिसांना पाचारणं केले. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशी अंती अरमान रहीम शेख याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता  बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा 8,12,126(2),74,75,79 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply