माजलगाव-
दोन दिवसांपूर्वी माजलगाव शहरातील बेकर्स लॉंज या कॅफे मधे एका तरुणीवर अत्याचार झाला. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलीच्या आईने केलेल्या तक्रारी नंतर आरोपी अरमान रहीम शेख रा. इंदिरा नगर माजलगाव याच्या विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला. काल दुपारी पीडित मुलीने आई सोबत पोलीस स्टेशन येथे जाऊन जवाब दाखल केला आहे.
माजलगाव शहरात घडलेल्या घटने नंतर संपूर्ण जिल्हा हादरून गेला प्रकरणाला लव्ह जेहादचा कंगोरा असण्याची दाट शक्यता आहे.आज पीडित मुलगी जवाब देण्यासाठी डी. वाय. एस. पी. कार्यालयात दाखल झाली तपास अधिकारी महेश भोसले यांनी पीडित मुलीचा जवाब घेतला असून अनेक धक्कादायक बाबी लवकरच उजेडात येतील असे दिसते.
मुलगी मेडिकलला जात असताना मुलीचा पाठलाग पोलिसांनी घेतले ताब्यात.
आज सकाळी पीडित मुलगी तिच्या आई सोबत माजलगावात आली सकाळपासून दोन तरुण तिचा पाठलाग करू लागले. मुलगी व आई घाबरून बस स्थानकात गेले तिथेही हे तरुण त्यांच्या मागोमाग गेले मुलीच्या आईने डी. वाय. एस. पी कार्यालय गाठले तिथेही हे तरुण त्यांचा पाठलाग करतं आले तेंव्हा मुलीच्या आईने तेथील पोलिसांना या बाबत सांगितले पोलिसांनी तात्काळ या तरुणांना ताब्यात घेतले आहे. मुलीला मेडिकल चेक अप साठी पाठवले असून लवकरच मेडिकलचा रिपोर्ट येणारं असल्याचे समजते.
मुलीला पोलीस संरक्षणाची गरज
पीडित मुलगी ग्रामीण भागातील असून रोज तिला तपासासाठी शहरात यावे लागत आहे तिच्यासोबत तिची केवळ आई असून प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत त्यांना पोलीस संरक्षणाची आवश्यकता आहे आज ज्याप्रमाणे दोन तरुणांनी त्यांचा पाठलाग केला त्यावरून त्यांना पोलीस संरक्षण दिल्यास मुलगी भयमुक्त राहून पोलीस तपासात सहकार्य करेल अशी कुटुंबाची भावना आहे.