पहा काय म्हणाली गौतमी पाटील…
गौतमी पाटील (Gautami Patil) मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. आज तिने तिच्या जीवनातील खास व्यक्ती विषयी भाष्य केलं आहे.गौतमीच्या आयुष्यातील ‘ती’ खास व्यक्ती, त्या व्यक्तीसाठी गौतमी पतीला देखील सोडायला तयार, पाहा काय म्हणाली नृत्यांगना गौतमी पाटील?
मुंबई : गौतमी पाटील (Sabse Katil Goutami Patil) ही महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध नृत्यांगना आहे. महाराष्ट्रात गौतमी पाटील चाहत्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. मात्र, असे असले तरी तेवढेच तिचे विरोधक सुद्धा आहेत. तिच्या डान्स शैलीवर नेहमीच आक्षेप घेतला जातो. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलावंत गौतमी पाटीलच्या डान्सला लावणी मानत नाहीत.
सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. बऱ्याच वेळा गौतमीला ट्रोलिंगचा सामोरे जावे लागले. रिलस्टार म्हणून प्रसिद्ध झालेल्या गौतमी पाटील (Gautami Patil) आणि वाद एक अतूट नाते बनले आहे. कपडे बदलताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानें गौतमी वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली.या बरोबरच गौतमी तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते.
नुकतेच गौतमीने तीच्या स्वप्नातील जोडीदाराबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं.होणारा पती कसा हवा याबद्दल गौतमीने मोठं वक्तव्य केलं होतं. जोडीदाराबद्दल गौतमी म्हणाली, ‘मला प्रसिद्धी, प्रतिष्ठा, बंगला, पैसा… काहीही नकोय. माझ्या आयुष्यात जी परिस्थिती येईल, त्या परिस्थितीत माझी साथ देणारा जोडीदार मला हवा आहे…’ असं गौतमी म्हणाली होती.
आता गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात गौतमी तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीबद्दल बोलताना पहायला मिळते. गौतमी म्हणाली, ‘आता जेवढं चालू होतं ते तिच्यासाठीच चालू होतं. असं वाटतं मी लग्न करून जाईल तेव्हा तिचं कसं होईल. तिच्याकडे कोण बघेल. तिला कोण सांभाळणार. तिला मी कधी एकटं सोडणार नाही. नवऱ्याला सोडेल… विषय होता आई…’