शेवगाव प्रतिनिधी
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी शेवगावात मोठा राडा झाला जयंती मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात येताच मिरवणुकीवर तुफान दगडफेक करण्यात आली.दगडफेक का करण्यात आली याचे उत्तर अद्यापी मिळालेले नाही दरम्यान दगडफेक करणारे आरोपी अद्याप मोकाट असून त्यांना अजूनही पोलीसांनी अटक केली नसल्याने शहरातील हिंदू समुदाय व व्यापाऱ्यात प्रचंड रोष निर्माण झाला आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींना सोडणार नाही अशी भूमिका घेतली परंतु पोलीस प्रशासनाने आरोपींना अद्यापी अटक केली नसल्याने व्यापारी प्रचंड दहशतीखाली आहेत.जो पर्यंत पोलीस आरोपींना अटक करत नाहीत तो पर्यंत शेवगावातील व्यापारी दुकानं उघडणार नसल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.