‘या’ मोठ्या नेत्याची भविष्यवाणी
नाशिक – शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभा सदस्य संजय राऊत हे सतत कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात.काल नाशिक मध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकार बाबत मोठी भविष्यवाणी केली.राज्य सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, या दाव्याचा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शनिवारी पुनरूच्चार केला. राज्यातील अवैध सरकार व्हेंटिलेटरवर आहे. तेच सर्वोच्च न्यायालयाकडून काढून घेतलं जाऊ शकतं. शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरू शकतात, असे ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले. न्यायालयात प्रलंबित असलेल्या सुनावणीचा त्यांनी संदर्भ दिला.
दरम्यान, नाशिक येथिल शिवसेना ठाकरे गटाचे 40हून अधिक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यापार्श्वभूमीवर संजय राउत यांनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार निशाणा साधला. खरे शिवसैनिक हे ठाकरे गटासोबत असून जे डुपलिकेट आहेत ते शिंदे गटात सामील होत आहेत, असेही राऊत यावेळी म्हणाले. ठाकरे गटाला लागलेली गळती थांबविण्यासाठी राऊत नाशिकला असल्याचे बोलले जात आहे.