वाळू माफियांवर पोलिसांची धडक कारवाई 

बीड, दि.११: आयपीएस डॉ.धीरज कुमार यांचे पथकाने अवैध व्यवसायिका विरुद्ध धडक कारवाईचा सपाटा लावला आहे.त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून बेकायेशीररित्या वाळू उपसा करणाऱ्या विरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत १० केन्या, ८ ट्रॅक्टर व १००० पेक्षा अधिक ब्रास वाळू जप्त केली. या धडक कारवाई ने गेवराई, माजलगाव तालुक्यातील वाळू माफियांत चांगलीच दहशत बसली आहे.

 

याविषयी पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,पोलीस अधीक्षक बीड, अपर पोलीस अधीक्षक बीड, सहायक पोलीस अधीक्षक, श्री. डॉ. बी. धीरजकुमार यांचे मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय माजलगाव येथील पथकाने सोमवार दि.१० रोजी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान पोलीस स्टेशन गेवराई हद्दी मध्ये खामगाव- सावरगाव शिवारामध्ये गोदावरी नदी पात्रात काही इसम ट्रॅक्टर हेडला केनी जोडुन नदी पात्रातील पाण्यातुन अवैध रित्या वाळूचा उपसा करत असल्याची माहिती मिळाली. यावरून IPS डॉ. धीरज कुमार यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश इधाटे, पोलीस हवालदार अतिषकुमार देशमुख, पोलीस नाईक अशोक नामदास, पोलीस कॉन्स्टेबल गणेश नवले, संतराम थापडे, युवराज चव्हाण, तुकाराम कानतोडे यांनी गोदावरी नदी पात्रातील ०८ ट्रॅक्टर, १० केन्या, अंदाजे १००० ते ११०० ब्रास अवैध रित्या उपसा केलेल्या वाळु जप्त केली आहे. मात्र यावेळी नदीपात्रातील सर्व इसम ट्रॅक्टर, केन्या इतर साहीत्या जागीच टाकुन पसार झाले. जप्त केलेले ८ ट्रॅक्टर आणि १० केन्या पोलीस कारवाईमध्ये पोलीस स्टेशन गेवराई येथे जमा केले आहेत. महसुल प्रशासाना मार्फत दंडात्मक कारवाई करण्यासाठी लेखी रिपोर्ट दिला आहे.

Leave a Reply